इस्लाम धर्माचे संस्थापक आणि पारंपारिक इस्लाम धर्माच्या धारणांप्रमाणे परमेश्वराचे अंतिम प्रेषित असलेले मुहम्मद पैगंबर यांनी साधारणपणे इ.स.६०९ ते ६३२ या कालावधीमध्ये 'कुरआन' मधला संदेश अवतरीत केला. प्रत्यक्ष अल्लाहने मुहम्मद पैगंबर यांना 'कुरआन' चा संदेश सांगितला आणि तो एकदम न सांगता थोडाथोडा सांगितला असे मानण्यात येतं. आज जगभरात लोकसंख्येच्या २४ टक्क्यांहून अधिक मुस्लिम वास्त्यव्य करतात. कुरआन मध्ये 'मी कोण आहे ? माझ्या निर्मितीचा हेतू काय?माझं जगाशी नातं काय? जीवन आणि मृत्यू काय आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. कुरआनमध्ये शांतीचा संदेश आहे, मात्र ज्यावेळी संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल आणि स्वतःचा बचाव करायचा असेल तर त्यावेळी युध्द करावं असंही सांगितलं आहे. 'ला इलाह इल्लिल्लाह मुहम्मद रसूल्लिल्लाह ' म्हणजेच अल्लाहशिवाय इतर कुणीही पूजनीय नाही आणि मुहम्मद हा अल्लाहचा प्रेषित आहे असं म्हटलं आहे आणि यालाच कुरआनची मुख्य शिकवणही मानतात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.