करवीरनरेश श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं समाजसुधारणेच्या क्षेत्रातलं स्थान अढळ आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश सत्तेची पाळंमुळं देशात खोल रुजत असताना त्यांनी आपल्या संस्थानात सामाजिक सुधारणांना बळ देऊन नवा समाज घडवण्यासाठी अखंड प्रयत्न प्रयत्न केले. प्राथमिक शिक्षण, जातिभेदनिवारण, अस्पृश्यतानिवारण इत्यादी सुधारणांचा पुरस्कर्ता म्हणून ओळखला जाणारा हा राजर्षि सर्वार्थानं वेगळाच होता. तो गोरगरीब, दीनदलितांचा राजा होता, विद्वानांचा चाहता होता, कलावंतांचा त्राता होता, समाजसुधारकांचा दाता होता, शिक्षणाचा भोक्ता होता आणि स्थिर चित्तानं समाजहितैषी धोरणं आखून ती खंबीरपणे अमलात आणणारा द्रष्टा नेताही होता.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.