रामकृष्णहरी' हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे. परमेश्वराच्या अनेक अवतारांमध्ये राम आणि कृष्ण हे सर्वांत महत्त्वाचे असल्यामुळे त्यांच्या नावांचा समावेश मूलमंत्रात केला गेला. विठ्ठल म्हणजे द्वारकेहून पंढरीला आलेला कृष्ण, अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे. त्यानुसार या संप्रदायाने कृष्णाचे तत्त्वज्ञान व चरित्र यांच्यावर भर देणे अगदीच स्वाभाविक असले, तरी या संप्रदायातील संतांनी रामचरित्राचाही अभ्यास व त्यावर लेखन केले आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.