रेडलाइट एरिया म्हटलं की, अनेकांची नाकं मुरडली जातात.... 'कुलटा', 'किटाळ', 'वेश्या', 'रंडी'... असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणवलं जातं. पण व्यापकदृष्ट्या, समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशिबी काय येतं... दुःख- दैन्य आणि नरकासम भोगवटा ! अशी अनेक आयुष्यं जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे. त्यांनी या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्यांची परिस्थिती- शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे. खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा... या स्त्रियांचं जगणं त्याच सच्चेपणाने चितारणारं हे पुस्तक.... रेड लाइट डायरीज... खुलूस !
Bitte wählen Sie Ihr Anliegen aus.
Rechnungen
Retourenschein anfordern
Bestellstatus
Storno