अक्षय मंजिरीला घ्यायला तिच्या घरी जातो. दोघे गप्पा मारत ऑफिसला येतात. सगळं व्यवस्थित सुरू आहे असं वाटत असतानाच अक्षयला मंजिरीबद्दल काही समजतं. मंजिरीबद्दल समजल्यावर अक्षय इतका उदास होतो की, तो सरळ जॉब सोडून द्यायचा विचार करतो. अक्षयला वाटतं मंजिरी त्या एक्सकडं परत जाणार आहे. माधुरी त्याला समजावते. अक्षय मंजिरीच्या एक्सबरोबर भिडतो. दोघांचे वाद होतात. अक्षय मंजिरीसोबत ट्रेकला जातो. तिथं गेल्यावर आणि अगदी छान वेळ घालवल्यावर अक्षयला वाटतं की, आता आपण मनात आहे ते मंजिरीला सांगून टाकावं. मंजिरी हो म्हणाली यावर अक्षयचा विश्वासच बसत नाही. दोघे इतके दिवस साठलेलं सगळं एकमेकांशी बोलतात. मंजिरी त्याला काही प्लॅन करण्याबद्दल बोलते.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.