रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे सध्या जगभराचं वातावरण ढवळून निघालंय. मिनिटांगणिक येणारे नवीन अपडेट्स आणि लाईव्ह कव्हरेज यांनी तमाम वृत्तवाहिन्यांचे स्लॉट्स भरलेत. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रत्येकच ठिकाणी ब्रेकिंग न्यूज सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आहे. पण हे सगळं वृत्तांकन प्रत्यक्ष युद्धभूमीवरच्या परिस्थितीला अनुसरून आहे का? की आपण ज्या बातम्या, ज्या गोष्टी पाहायला हव्यात असं काही लोकांना वाटतं, तेवढ्याच बातम्या आपल्याला दाखवल्या जातात? प्रत्येक बाजू स्वतःला सोयीस्कर असलेलं सत्य दाखवत असेल तर आपण जे मत बनवतो ते योग्य असण्याची शक्यता किती? म्हणूनच असं म्हणायला हवं की युद्धभूमीवर चाललेलं युद्ध तर आहेच, पण त्यालाच समांतर असं आणखी एक युद्ध आहे, जे प्रत्यक्ष युद्धभूमीच्या बाहेर चाललंय. ते युद्ध म्हणजे माहितीचं युद्ध! इन्फॉर्मेशन वॉरफेअर! हे युद्ध नेमकं कसं चाललंय आणि यात कोण जिंकतंय, कोण हरतंय, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत... चला तर मग!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.