विनायक दामोदर सावरकर... भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या आणि प्रबोधनाच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं नाव. अनुयायी आणि विरोधकांनी कायम चर्चेत ठेवलेल्या सावरकरांच्या विचारांचं सध्या वरचेवर होत असणाऱ्या वादांच्या पलीकडे जाऊन चिंतन क्वचितच होत असावं. हिंदुत्वाचे आद्य पुरस्कर्ते, भारतीयत्वाची व्याख्या करणारे विचारवंत म्हणून सावरकर ओळखले जातात. पण या ओळखीच्या पलीकडे जाऊन विज्ञाननिष्ठा, बुद्धीवाद आणि समाजक्रांतीचे विचार मांडणारे सावरकर आपल्या विचारविश्वात दीर्घकाळ दुर्लक्षित राहिले. जातउच्छेदक निबंध, विज्ञाननिष्ठ निबंध, क्ष किरणे या पुस्तकांतून त्यांनी समाजक्रांती, अंधश्रद्धा आणि विज्ञान या विषयावर आपले विचार मांडले. आजच्या काळातही त्या विचारांची उपयोगिता कायम आहे. त्यापैकी काही महत्त्वाचे विचार आज आपण जाणून घेणार आहोत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.