विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकाने काय भोगले याची गाथा सव्यसाची मध्ये ग्रंथीत झाली आहे. नवी अर्थव्यवस्था आणि त्या अनुषंगाने ढवळून निघालेली जुनी व्यवस्था आणि मूल्ये , राजकारणाचा झालेला अधः पात आणि गुन्हेगारीकरण , धार्मिक तेढ वाढवत त्यांचा धंदा करणारे दलाल, आणि या सोबत असहाय्यपणे या नव्या वातावरणाशी जुळवत, नवी स्वप्ने पाहत फरफटणारा संभ्रमित समाज याचे विराट दर्शन या महाकादंबरीत घडते. सर्वव्यापकता एवढेच या कादंबरीचे वैशिष्ट्य नसून या [परिवर्तनाच्या काळात सामील झालेल्या सर्वच भल्या- बुऱ्या पात्रांचे , त्यांच्या जीवनाचे आणि संभ्रमाचे आणि घटनांचे चित्रण अत्यंत सहृदयतेने संजय सोनवणी यांनी केल्याने कारुण्याचा परिसस्पर्श या कलाकृतीला झालेला आहे. एकाच प्रवाहात कारुण्य , कोमलता , नृशंसता यांचा मिलाप साधताना सर्वच घटकांची मीमांसाही केली आहे. ऐतिहासिक किंवा चरित्र कादंबऱ्यांवर समाधान मानाव्या लागणाऱ्या मराठी रसिकांना "सव्यसाची "च्या रूपाने वर्तमानाचा आरसा लाभला आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.