प्रत्येक क्रिमिनलची कुठलीतरी खास सिग्नेचर असते. पण आधी ख्रिसमस कार्ड्स पाठवत नंतर चोरी किंवा खून करणारा क्रिमिनल तुम्हीं कधी ऐकलाय? बरं कार्ड्सही येतात ती बरोबर सात. पहिल्या दिवशी दोन, मग तीन आणि मग परत दोन. अशी सात कार्ड्स आली की मग त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या घरात एकतर दरोडा तरी पडतो किंवा मग थेट त्या घरमालकाचा खून होतो. शेरलॉक होम्सच्या डोक्याला या विचित्र केसनं चांगलंच खाद्य मिळालंय. तो आणि वॉटसन या केसच्या मागावर असतानाच अचानक बेकर स्ट्रिटच्या पत्त्यावर शेरलॉकला स्वतःला तशीच ख्रिसमस कार्ड्स यायला लागलीयत! तो जो कुणी क्रिमिनल आहे त्याच्या रडारवर दस्तूरखुद्द शेरलॉक होम्स आहे. शेरलॉक त्याच्यापर्यंत पोचायच्या आत खरंच तो क्रिमिनलंच शेरलॉकपर्यंत पोचेल का? थेट शेरलॉकला चॅलेंज करणारा हा क्रिमिनल आहे तरी कोण?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.