प्रभू रामचंद्रांच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ शिवाजी महाराजांनाही पडली होती, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नावही राम ठेवले. चाफळच्या राम मंदिर देवस्थानला त्यांनी सर्वतोपरी साह्य केले. तेथील रामनवमी उत्सव नियमित सुरू राहावा, यासाठी विशेष तरतूद केली. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज व राजाराम महाराजांनीही परकी आक्रमणापासून या मंदिराचे रक्षण करण्याची आणि तेथील नित्यनेम सुरळीत ठेवण्याची खबरदारी घेतली.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.