महाराष्ट्र स्वातंत्र्यात आणि वैभवात नांदत होता. वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, कदंब वगैरे राजघराण्यांनी, विद्वानांनी आणि कलावंतांनी महाराष्ट्र सजविला होता.शालिवाहनांपासून यादवांपर्यंत या भाग्यभूमीवर कधीहि परकिय शत्रूची सांवली पडली नाही. पण वा-यालाही चाहूल लागू न देता देवगिरीवर दुष्मन चालून आला. पठाणी फौज घेऊन अल्लादिन खिलजी आक्रंदत, आक्रोशत देवगिरीवर येऊन धडकला. यावेळी रामदेवरायाचे सैन्य व सेनापती राजधानीत नव्हतेच. वखवखलेल्या पठाणांची झडप पडली मराठ्यांच्या लक्ष्मीवर ! रामदेवराव अलाउद्दीनास बिनशर्त शरण गेला शनिवार दि.६ फेब्रूवारी १२९४ रोजी महाराष्ट्राची स्वतंत्रता संपली. सुलतानांची सत्ता सुरू झाली आणि मराठ्यांची बुध्दी आणि तलवार सुलतानांच्या चाकरीत आता रमून गेली होती. आपापसात वैर गाजवणे सुरू झाले. विवेकसिंधु आटला होता. महाराष्ट्राचा शिवपूर्वकाल असा होता....!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.