"शोधावेडे शास्त्रज्ञ "हे पुस्तक आपल्या विचारांच्या ध्यासापोटी भौतिक सुख आणि ऐहिक कर्तव्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शास्त्रज्ञांची थोडक्यात चरित्र आपल्यापुढे मांडतं . या शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक प्रगतीला हातभार लावण्याची मोलाची कामगिरी केली. सर हंफ्रे डेव्ही वरचा लेख थोडा वेगळा आहे. ते एक महान शास्त्रज्ञ होते. पण ज्या सुरक्षा दिव्यांमुळे त्यांना अनेक सन्मान मिळाले तो खरेतर कामगारांच्या दृष्टीने प्राणघातक ठरला होता. असं सिद्ध झालं . विज्ञानाच्या इतिहासात एखाद्या शास्त्रज्ञांच्या चुका किंवा त्याने निवडलेला मार्ग योग्य नसाल तरी या बाबी लपवून चालत नाहीत तर त्या जगापुढे मांडल्यामुळे इतर शास्त्रज्ञांना त्या "लाल दिवा दाखवून हा तुमचा मार्ग नव्हे " हे सूचित करण्यासाठी उपयुक्त ठरतात .
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.