१९३८ ते ५८ हा गोल्डन एज ऑफ सायन्स फिक्शनचा काळ. या काळातील निवडक विज्ञानकथांचा श्री. निरंजन घाटे यांनी अनुवाद केलेला आहे. भविष्यकाळात घडू शकणारी, अवकाशाशी निगडित अनेक सत्ये आणि विज्ञानाला धक्का न लागू देणारं, नवतंत्रज्ञान - नवविज्ञान कल्पून ह्या कथांत मांडण्यात आलं आहे. ह्या कथा वाचून या कथांच्या प्रभावाने अनेक मराठी कथाकारांनी विज्ञानकथा लिहिण्यास प्रारंभ केला आहे. विज्ञानकथांच्या अभ्यासकांसाठी या कथासंग्रहातील कथा उपयुक्त ठरतील. मानवाच्या भावी काळात काय घडू शकेल आश्र्चर्याचे धक्के देणारे कोणते तंत्रज्ञान विकसित होईल. याविषयीचे कल्पनाविश्र्व या पुस्तकात शब्दांकित केले आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.