राजा सुहेलदेव हा एक अभिमानी भारतीय होता, सर्वात क्रूर अशा परकी आक्रमकांसमोर आपली भूमी थरकापत होती, अशा वेळी भारतमातेच्या रक्षणासाठी तो उभा ठाकला. त्याने सर्वांना—सर्व जातींचे हिंदू, बौद्ध आणि भारतीय मुस्लिम यांना—त्याच्या नेतृत्वाखाली एकत्र आणलं. ते त्यांच्या मातृभूमीसाठी लढले. आणि त्यांनी एक देदीप्यमान विजय मिळवला. हा विचारच फार उत्तेजित करणारा आहे, पण या भारताच्या सुपुत्राकडून आणखी एक गोष्ट शिकण्यासारखी आहे: आपण जेव्हा भारतीय म्हणून एकत्र येतो, तेव्हा आपण अजिंक्य असतो. माझी देशभक्ती आणि भारतमातेबद्दलचं माझं प्रेम मला ही कथा सांगायला भाग पाडतात. पण त्याचं आणखीही एक कारण आहे. जाती-समाजाबद्दलचे दावे काहीही असोत, पण राजा सुहेलदेव शिवभक्त होता ही गोष्ट सर्वमान्य आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.