कुटुंबाच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करणार्या कुटुंबप्रमुखाची करूण कथा ' मानवी जीवन हा एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. स्वत:चे सुख आणि विकास हि या संगमातील पहिली नदी. कुटूंबाचे ऋण फेडणे हा त्यातला दुसरा प्रवाह आणि ज्या समाजाचा घटक म्हणून समाजाच्या प्रगतीला हातभार लावणे ही या संगमातील गुप्त सरस्वती.' व्यतिगत ऋण, कुटूंबऋण आणि समाजऋण ही तीनही सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अविरोधाने नांदू शकली तरच हे जीवन यशस्वी झाले असे म्हणता येईल. मानवी जीवनाचे रहस्य सांगणारे हे क्रांतिवीर विचार वि. स. खांडेकरांनी ' सुखाचा शोध ' या कादंबरी मांडले आहेत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.