महाविद्यालयीन जीवनापासून ओळखत असणा-या आणि नंतर खूप जवळची मैत्री झालेल्या ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या व्यक्तिमत्वाचे सखोल रेखांकन करणारे हे व्यक्तिचित्र लिहिले आहे अनिल अवचट यांनी... ! एका साध्यासुध्या सरळसोट जगणा-या आणि सामाजिक संस्थांसाठी काम करणारी ही कार्यकर्ती अचानक चित्रपट निर्मितीकडे कशी वळली ही म्हटलं तर एक विलक्षण कहाणीच म्हटली पाहिजे. बाई या लघुपटापासून सुरू झालेला हा चित्रपट प्रवास मराठी चित्रपट क्षेत्रात एक वेगळी सामाजिक चित्रपटांची वहिवाट घडवून गेला. नव्या पिढीला चित्रपट निर्मितीचा आत्मविश्वास व प्रेरणा दिली. हे कसे घडले याची संहिता म्हणजेच ही सुमित्राची संहिता. ऐका- सुनील गोडसे यांच्या आवाजात
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.