मध्यम वर्ग म्हणलं, की खाऊन-पिऊन सुखी, प्रामाणिकपणे काम करून कुटुंबाला आनंदात ठेवणारा समाजातील एक मोठा आणि महत्त्वाचा घटक आपल्या डोळ्यासमोर येतो. आयुष्यात कितीही अडथळे आले आणि कितीही अवघड परिस्थितीचा सामना करायची वेळ आली तर विनातक्रारपणे तोंड देणारा हा मध्यमवर्ग नक्की कसा आहे, मध्यमवर्गाची मनःस्थिती नक्की काय असते, मध्यमवर्गात नक्की कोण मोडतं, मध्यमवर्गीयांच्या समस्या काय आणि मध्यमवर्गाला आपली मतं समर्थपणे कधी मांडता येतील या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत सक्रिय कार्यकर्ते आणि सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी 'Sunday With देशपांडे' या पॉडकास्टमध्ये!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.