शिवाजीराजांचे लक्ष लागले होते कोंकणपट्टीवर. राजांना हवें होते बल्याढ आरमार. त्यांनी कोकणात पाय टाकून रायगड जिंकला होताच. आता त्यांनी झडप घातली दाभोळ बंदरावर. मुरूड आणि दंडराजपुरी या सागरकिनारी भागातील बराचसा भूभाग व किनारा अत्र्यांनी स्वराज्यात दाखल केला. सह्याद्री, शिवाजी आणि समुद्र आता एक झाले. याच कोंकणस्वारीत शिवाजीराजांनी कल्याण प्रांतातील प्रचंड किल्ला माहुलीगड जिंकला. आरमारावर राजांनी दर्यासारंगास सरखेल नेमले. त्यांच्या दिमतीस दिले इब्राहिमखान, दौलतखान आणि मायनाक भंडारी यांना... स्वराज्याचा विस्तार होऊ लागला...!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.