महाराजांनी औरंगाजेबाविरुध्द उघडउघड युध्द सुरू करण्याचा निश्चय केला. राजधानीच्या राजगडावर अवघ्या सहा कोसांवर असलेल्या कोंढाणा किल्ल्यापासून या मोहिमेचा शुभारंभ करावा असे त्यांनी ठरविले. महाराजांनी सिंहगडाच्या मोहिमेसाठी मावळातील तालेवार मर्द मंडळी राजगडावर बोलावली. त्यात कोकणातील उमरठ गावच्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांनाही थैली पाठवून बोलाविले. तान्हाजीरावांबरोबर त्यांचा धाकटा भाऊ सुर्याजीही आला. महाराजांनी कोंढाण्याचा डाव सर्वांपुढे मांडताच, कुणी काही बोलायच्या आतच तान्हाजीराव मालुसरे यांनी झटकन महाराजांनी म्हटले, महाराज, गड कोंढाणा मी घेतो. !
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.