लॅरी पेज आणि सर्गि र्ब्रीन या जोडीने गुगल हे सर्च इंजिन सुरु केले. त्यांनी जगातील सर्व माहिती एकत्रीत करुन, तिचे नियोजन करुन सर्वांना मोफत उपलब्ध करुन देण्याच्म महत्त्वाचे काम केले आहे. आजच्या घडीला गुगल ही जगातील सर्वात यशस्वी ईंटरनेट कंपनी आहे. गुगल वापरली नाही असा एकही संगणक वापरकर्ता शोधुनही सापडणार नाही. लॉरेन्स उर्फ लॅरी पेज हा अमेरिंकन संगणक अभियंता तर सर्जी ब्रिन हा रशियन अमेरिकन संगणक अभियंता दोघांच्या कल्पनाविश्वातून गुगल सारख्या सर्च इंजिनची कल्पना प्रत्यक्षात आली. दोघेही पी.एच.डी. करताना त्यांची मैत्री झाली आणि त्यांनी डेटा मायनिंग व सर्च इंजिनचा अभ्यास करतानाच एका लहान गॅरेजमधून गुगलवर काम करायला सुरूवात केली. पी.एच.डी.चा विचार त्यांनी पुढे ढकलला आणि गुगल कंपनीवर लक्ष केंद्रित करून आज जगातली सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांनी आपले नाव कोरले. त्यांचा संघर्ष आणि यशाची वाटचाल तुम्हाला नक्कीच आवडेल.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.