गुलियेल्मो मार्कोनीचा जन्म इटलीतील 'बोलोन्या' शहरात एप्रिल २५, १८७४ रोजी झाला. मार्कोनीच्या जन्माच्या आधी १८६८ मध्ये मॅक्सेल या शास्त्रज्ञाने विजेचा प्रवाह वातावरणात आहे, अशी कल्पना मांडली होती. मार्कोनीला लहानपणापासूनच विजेच्या प्रवाहाबाबत कुतूहल होते. हाइनरिक हर्ट्झचे लेखही त्याने वाचले होते. १८९५ मध्ये मार्कोनी हर्ट्झच्या संशोधनावर आपल्या वडिलांच्या बोलोन्यातील मोठ्या वाड्यात काम करू लागला. तो आपला पहिला बिनतारी संदेश एक मैल लांब पाठवू शकण्यात यशस्वी झाला. जून २, १८९४ मध्ये इंग्लंडमधील मुख्य पोस्ट ऑफिसच्या छपरावरून मार्कोनीचे पहिले प्रात्यक्षिक करण्यात आले. १९१४ मध्ये पहिले जागतिक युद्ध पुकारले गेले. मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचा इटालियन नौदल, वायुदलास फार उपयोग झाला. जगातील सर्वांत मोठे वायरलेस स्टेशन मार्कोनीने उभारले. मार्कोनीला भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक व इतर अनेक पारितोषिके मिळाली... ऐका मार्कोनीचे चरित्र
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.