चंगळवादाने सारे जग त्रस्त असताना चंगळवादाचे समर्थन करणारा अर्थतज्ञ म्हणजे जॉन मेनार्ड केन्स. त्याने आपला ग्रंथ द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट ॲंड मनी मधून श्रीमंताच्या उपभोगातून निर्माण होणारे व्यवहार गरीबांचे रोजी रोटीचे प्रश्न सोडवत असतात असा सिध्दान्त मांडला. त्याने फक्त प्रश्न मांडले नाहीत तर वेलफेअर स्टेट ही संकल्पना मांडली ज्याचा प्रभाव अनेक देशांवर पडला. शिक्षण, आरोग्य, पेन्शन, आजारी व वृध्दांना मदत, बेरोजगारी भत्ता अशा त-हेच्या अनेक कल्याणकारी योजना केन्सने मांडल्या.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.