टिळकांचा साधेपणा त्यांच्या कुटुंबातही दिसून येत असे. स्वतः टिळकांचे अंगावर एका तांबड्या पगडीशिवाय रंगीत असे कोणतेच वस्त्र नसे. नेसावयाचे साधे गिरणीमाल धोतर, एक मांजरपाटी धुवट सदरा, पांढरा स्वच्छ अंगरखा आणि दोन -अडीच रूपयाच्या नागपुरी उपरण्या जोडीतील एक पान एवढाच त्यांचा पोशाख असे. त्यांनी हातरूमालही सहसा कधी वापरला नाही व साध्या चार-सहा आण्याच्या काठीपेक्षा बहुमोल काठीही हातात घेतली नाही.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.