यंदाच्या वार्षिक अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका विषयाचा ओझरता उल्लेख केला. त्यावर फारशी चर्चा माध्यमांनीही घडवून आणली नाही. तो विषय म्हणजे शासकीय पातळीवर तृणधान्य उत्पादनाला देशभरात प्रोत्साहन देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यावर्षी युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंम्बलीव्हामध्ये एक ठराव पास करण्यात आला. त्यानुसार २०२३ हे वर्ष संयुक्त राष्ट्राने 'इयर ऑफ मिलेट्स' म्हणून घोषित केलंय. त्याला अनुसरूनच भारत आता येत्या काळात मिलेट्स, म्हणजेच तृणधान्य उत्पादन आणि संशोधन यावर भर देणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्या निमित्ताने भारतात राहणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी तृणधान्यं महत्त्वाची का आहेत, आणि सरकारने त्यासाठी येत्या काळात कोणती धोरणे ठरवली आहेत, याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.