गोस्वामी तुलसीदासांनी 'रामचरितमानसा'ची रचना करताना केवळ आदिकवी वाल्मीकींच्या रामायणाचा आश्रय घेतला नाही. रामचरित्रातील आदर्श ध्येयवादाचे, आदर्श कुटुंबव्यवस्थेचे आणि आदर्श राज्ययंत्रणेचे चित्र सुस्पष्ट करण्यासाठी गोस्वामीजींनी रसाळ दृष्टांत- रुपकांचा आधार घेतला. साऱ्या कथेला भक्तिरसात न्हाऊ घातले. एक अतिनम्र भावूक भक्त, अशी भूमिका घेऊन त्यांनी जी आत्मचर्चा त्यात आणली, तिच्या योगाने त्यांचा ग्रंथ हा परमार्थप्रवण साधकांना नित्यपाठासाठी नित्य आवडीचा ठरला आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.