उद्योग तुमचा, पैसा दुसर्याचा' या पुस्तकाच्या लक्षणीय यशानंतर सुरेश हावरे आजच्या तरुण उद्योजकांसाठी यशस्वितेचा आणखी एक 'पुस्तक-मंत्र' घेऊन येत आहेत. हे पुस्तक म्हणजे 2015 साली झी 24 तास या वाहिनीवर सादर झालेल्या 'दि सुरेश हावरे बिझनेस शो'चं संपादित स्वरूप. हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय ठरला होता. या 'शो'मध्ये शून्यातून विश्व निर्माण करणार्या धडाडीच्या उद्योजकांच्या मुलाखती हावरे यांनी घेतल्या. तब्बल 72 लाख लोकांनी हा 'शो' बघितला आणि त्यातून प्रेरणा घेऊन सहा हजारांहून अधिक तरुणांनी नव्याने उद्योगही सुरू केले. हावरे हे स्वत: अनुभवी उद्योजक असल्यामुळे या मुलाखती वेगळी उंची गाठू शकल्या. या मुलाखतींमधून उद्योजकांनी प्रकट केलेले विचार, सांगितलेले अनुभव, तसेच त्यांच्याशी झालेल्या संवादातून व्यक्त झालेले 'मॅनेजमेंट थॉटस्' हे सर्व व्यावसायिकांना एक नवी दृष्टी देऊन जातात. ही नवी दृष्टी देण्यासाठी आणि या 'बिझनेस बाजीगरांची' जिद्द, मेहनत, ध्यास, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व असे अनेक गुण आजच्या तरुणांपुढे आणावेत या उद्देशाने हावरे यांनी हे पुस्तक तयार केलं आहे. नवउद्योजकांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी उद्युक्त करणारं आणि उद्योग भरभराटीचा हमखास फॉर्म्युला सांगणारं पुस्तक… उद्योग करावा ऐसा !
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.