संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या 'इर्शाद' या मराठी गजल आणि कवितांच्या कार्यक्रमाला आक्षेप घेत, दिवाळीच्या औचित्याने उर्दू नाव असलेला कार्यक्रम घेऊ नये असा फतवा गेल्या वर्षी काढला गेला होता. त्यानंतर दोन्ही कवींनी नाव बदलणार नसल्याचं सांगितलं आणि आयोजकांना कार्यक्रम मागे घ्यावा लागला. त्यानंतर एकंदरच मराठी भाषेत उर्दू, फारसी, अरबी भाषेतून आलेले शब्द आणि हिंदू संस्कृतीचे 'उर्दूकरण' वगैरे विषयावर चर्चा सुरू झाली. उर्दू ही मुस्लिमांची भाषा, म्हणून दिवाळीनिमित्त उर्दू शब्द नको असे आक्षेप घेणाऱ्यांचे मत होते. हा सगळा संस्कृतीसंरक्षणाचा वाद आणि त्यावरची मते वगैरे बाजूला ठेवली तरी उर्दू भाषा आणि तिचे भारतातील स्थान हा महत्वाचा विषय आहे आणि त्यावर चर्चा होणंही तितकंच महत्वाचं आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.