थॉमस मो(अ)र चं युटोपिया हा ग्रंथ १५१६ साली प्रकाशित झाला. या ग्रंथात त्यावेळची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती यांचं चित्र मोरनं युटोपियामध्ये रंगवलं आहे. युटोपिया हे दोन भागांत किंवा दोन पुस्तकांच्या रूपात विभागलं गेलं आहे. पहिला भाग डॉयलॉग ऑफ कौन्सिल या नावानं ओळखला जातो. तर दुस-या भागाला डिस्कोर्स ॲन युटोपिया असं म्हटलं जातं. या पुस्तकात गाव, प्रवास, व्यापार, वाहतूक, धर्म, लष्कर अशा अनेक गोष्टींबद्दल आणि त्यांच्या नियमांबदद्ल बोललं गेलंय. या पुस्तकात जे मांडलं ते सगळं काल्पनिक होतं तरीही या पुस्तकाला प्रचंड यश मिळालं. युटोपिया या बेटावरचं काल्पनिक सामाजिक व राजकीय चित्र मोरनं असं रंगवलं होतं की हे लेखन वास्तवातल्या राजकारणाकडे आणि समाजकारणाकडे उपहासात्मक आणि टीकात्मक म्हणून पाहिलं गेलं...
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.