बालपण आणि तरुणपण याच्यामध्ये एक अशी अवस्था असते, जिथे व्यक्ती ना धड लहान राहिलेली असते ना धड तरुण झालेली असते. बालपणातून तारुण्यात जाण्याच्या या काळात शरीर-मन सारेच आतून-बाहेरून बदलत असते. शारीरिक पातळीवर लैंगिक अवयवांची नवीन जाणीव, नवी ओळख होत असते तर मानसिक पातळीवर भिन्नलिंगी कुतूहल-आकर्षण जागे होत असते. हा काळ सर्वार्थाने एका 'रोलरकोस्टर' सारखा असतो. ही अवस्था ज्याची त्यानेच भोगायची असते. शेगडीवर ठेवलेल्या आधणाला उकळी फुटून वरच्या झाकणाला कोंडलेल्या वाफांनी धडका देण्याचे हे 'वाफाळलेले दिवस' प्रतीक पुरी यांनी त्यांच्या कादंबरीत अत्यंत धाडसाने रंगवले आहे आणि संचित वर्तक यांच्या लयबद्ध आवाजात साकारले गेले आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.