मराठीत विज्ञानाची-साहित्याची परंपरा तशी जुनी सांगता आली तरी तिला जोम असा अलिकडच्या काळातच आला, आणि तिला खरी प्रतिष्ठा लाभली ती डॉ. जयंत नारळीकर या जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञाच्या कथालेखनाने. १९७९ साली प्रकाशित झालेल्या 'यक्षांची देणगी' हा त्यांच्या विज्ञानकथांचा पहिल्याच संग्रहाला सामान्य वाचकांची व चोखंदळ समीक्षकांची लगेच मान्यता मिळाली. आधुनिक विज्ञानाच्या आधारावर भविष्यवेधी कल्पकतेने रचलेल्या मानवी जीवनातील संभाव्य घडामोडी डॉ. नारळीकरांच्या कथांमध्ये व्यक्त होतात. स्वत: अव्वल दर्जाचे शास्त्रज्ञ असलेल्या नारळीकरांनी गंभीर वैज्ञानिक वातावरणात काहीसा विरंगुळा मिळावा व मनोविनोदन व्हावे म्ह्णून, पण मुख्य्त: समाज़ात वैज्ञानिक दॄष्टिकोन रुजावा व प्रसॄत व्हावा या हेतूने, विज्ञानकथांचे लेखन केले. विज्ञानकथेकडून ते कादंबरीकडे वळ्ले. 'प्रेषित', 'वामन परत न आला' व 'व्हायरस' या त्यांच्या विज्ञानकादंब-यांनाही जाणकार वाचक-समीक्षकांची मान्यता प्राप्त झाली आहे. नारळीकरांच्या कथा-कादंबरी-लेखनात तत्त्वांचा पाया पक्का असतो. त्यांच्या कल्पकतेच्या रसायनाने विज्ञानाच्या क्षेत्रातील माणसांचे भावविश्व, त्यातील नाटयपूर्ण संघर्ष, त्यातील गूढ रहस्यमयता एकरस बनून जिवंत होते आणि मानवाच्या हिताची अंतिम मूल्यदॄष्टि त्यात अढळपणे व्यक्त होते.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.