भारताचे भूतपूर्व उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म एका गरीब शेतक-याच्या घरात झाला होता. शिक्षणाची आवड, सततचा व्यासंग आणि बुध्दिमंतांच्या सान्निध्यातून मिळालेली वैचारिक समृध्दीचा वापर करून त्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची कारकीर्द घडवली. ते एक सुसंस्कृत, संयमी, सौजन्यशील आणि भारद्स्त व्यक्तिमत्व होते. त्यांच्या भाषणांत यशवंतरावांच्या संसदपटुत्वाच्या अनेक छटा सापडतात. वादविवादात अनेक संदर्भ देत विरोधकांना नामोहरम करत. त्यांना आपल्या नर्म विनोदी शैलीने ते आपलेसं करत आणि आपला मुद्दा पटवून देत. जाती धर्म निरपेक्ष उदार मतवादी धोरणाचे पुरस्कर्ते असणा-या यशवंतरावांनी कृषि-औद्योगिक समाजाची कास धरली. महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातला प्रोत्सहान दिले तसेच ग्रामीण भागात औद्योगिकता पोहचावी यासाठी धोरणे आखली. शेतक-यांच्या हिताचे अनेक कायदे आणले. शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन दिले. ग्रामीण भागाचा विकास आणि समाजवादी समाजरचना हे ध्येय ठेऊन तरुण नेतृत्व पुढे यावे यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या निवड़क भाषणात उमटते.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.