मराठीमध्ये विज्ञानकथा रुजविण्याचं कार्य श्री. निरंजन घाटे गेली कित्येक वर्षं निष्ठेनं पार पाडीत आले आहेत. त्यांच्या विज्ञान-कथा-कादंबर्या वाचकांना एका वेगळ्याच भविष्यकालीन विश्वात घेऊन जातात. त्यातून विज्ञानत्तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा भविष्यकालीन आढावा घेतला जातो. त्याचबरोबर विज्ञानत्तंत्रज्ञानाची कितीही प्रगती झाली, तरी माणूस बदलत नसतो. राग, लोभ, मद, मोह, मत्सर या भावना तशाच राहतात, यांचंही दर्शन घडतं. मानवी उत्क्रांतीचा पुढचा टप्पा कोणता असेल, याचाही विचार घाटे यांच्या विज्ञानकथांमधून केलेला पाहावयास मिळतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.