जीवन हाही एक रेसकोर्सच ! यश आणि पैसा मिळवण्यासाठी माणसं उरीपोटी नुसती धावत असतात..... मग त्यातील काहींना यश मिळतं , तर काही जण अपयश आलं तरी यश मिळवण्याच्या लालसेने धावतच राहतात. लाखातला एखादा असा असतो कि धाव -धाव धावतो आणि यशही मिळतं पण त्यावेळेस ते उपभोगायला आयुष्यच राहिलेलं नसतं ! केवळ कमनशिबी .... दुसरा शब्द काय? "ओनर" ईशान सर्वोत्तम, देखणी लीना, प्रचंड आतमविश्वास असलेला मोहनदेव ,ज्याच्या मैत्रीपुढं जगाची श्रीमंती लाथाडावी असा बुकी अभिराम, टीनएजर असूनही समजूतदार असणारी सुजाता .... आणि अलौकिक व्यक्तिमत्व घेऊन आलेला मोहनदेवाचा वारस - मुलगा असीमदेव , आणि "ग्रँड फिली" म्हणावी अशी आभा .... रेसकोर्सच्या पार्श्व् भूमीवर लिहिलेली , भावनांच्या रंगांच्या उधळणीत ओथंबलेली , तरीही आयुष्य "स्टेक" ला लावणाऱ्या अजब व्यक्तिमत्त्वाची जीवनकहाणी - खास सुशी स्टाईल मध्ये. "झालं गेलं " सौरभ गोगटे यांच्या आवाजात .
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.