'अनाथ' हा शब्दच अंगावर शहारे आणणारा आहे. हा शब्द नुसता उच्चारला तरी आपलं मन वेगवेगळे विचार करायला सुरूवात करतं. जो प्रत्यक्ष या परिस्थितीतून गेला आहे, त्याला याचं गांभीर्य वेगळं सांगायची गरज नाही. या पुस्तकामधे "अनाथ म्हणजे तोच नाही, ज्याला आई-वडील नाहीत तर अनाथ म्हणजे तो, जो प्रत्येक गोष्टीपासून वंचित आहे," असे वर्णन केले आहे. हे संपूर्ण स्थित्यंतर वाचनीय आहे. अस्वस्थ करणारी परिस्थिती आपल्यासमोर येत असते पण या जगात असे अनेक जण आहेत की या परिस्थितीचा सामना समर्थपणे करून स्वतःचे स्थान निर्माण करतात. पुस्तक वाचल्यानंतर या सर्व 'अनाथांना' दया, सहानुभूती, मदत किंवा कर्तव्यभावना यापेक्षा 'स्नेहाची आवश्यकता आहे, याची प्रचीती येईल हे नक्की.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, B, CY, CZ, D, DK, EW, E, FIN, F, GR, H, IRL, I, LT, L, LR, M, NL, PL, P, R, S, SLO, SK ausgeliefert werden.